शबनम न्यूज | प्रतिनिधी
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे. एकदिलाने, एकमताने काम करावे. शिवसेनेने केलेली कामे, प्रश्नांची केलेली सोडवणूक तळागाळातील मतदारापंर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, अशा सूचना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी पदाधिकाऱ्यांना शनिवारी (दि. १५) केल्या.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ताथवडे येथील कासा दी सिल्व्हर हॉटेलमध्ये आढावा बैठक झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांना अहिर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर संपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील, जिल्हा प्रमुख, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख संजोग वाघेरे, माजी शहर प्रमुख सचिन भोसले, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, पुनम पोतले, शहर संघटिका रूपाली आल्हाट, जिल्हा समन्वयक सुशिला पवार, रोमी संधू, हाजी दस्तगीर मणियार, निवडणूक प्रभारी अशोक वाळके, युवा सेनेचे युवाधिकारी चेतन पवार, कैलास नेवासकर, वैभवी घोडके, कल्पना शेटे, संतोष म्हात्रे, गौरी घंटे, वैशाली कुलथे, वैशाली काटकर, सुषमा शेलार, तुषार नवले, हरेश नखाते, निलम म्हात्रे, ज्ञानेश्वर शिंदे, महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी, आढावा, संघटनात्मक बांधणी कशी सुरू आहे, याची संपर्क प्रमुख अहिर यांनी माहिती घेतली. तसेच सर्व प्रभागात उमेदवार तयार ठेवा. एकदिलाने काम करा. शिवसेनेने केलेली कामे, प्रश्नांची केलेली सोडवणूक तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहनही अहिर यांनी केले.








