शबनम न्यूज : प्रतिनिधी
चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक 31 मधील सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील ( ह ) प्रभाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये शेख उप अभियंता यांना प्रभागातील स्वामी समर्थ मठ कवडे नगर येथील ड्रेनेज लाईन दुरुस्ती करून चांगला रस्ता करण्यासाठी आठ महिन्यापासूनसांगत असल्यामुळे त्यांना त्याकामासाठी लेखीपत्र देऊन ते काम लवकर करण्याची विनंती केली.
विद्यानगर,नंदनवन कॉलनी,साईनाथ कॉलनी,विनायक नगर सुयोग कॉलनी शेजारील रस्ता,समता नगर आदर्श नगर,स्वामी विवेकानंद नगर येथील डांबरी रस्ते खराब झाल्यामुळे ते रस्ते पुन्हा दुरुस्त करावे आणि प्रभाग मधील जुने रमलर खराब झाले आहेत व ते स्पष्ट दिसत नाही त्यामुळे रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांना ती दिसत नाही त्यामुळे नागरिकांना त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून रमलर दुरुस्त करून द्यावा यांच्या या लेखीपत्रा बरोबर कृष्णा चौक,काटे पुरम चौक,शिव गणेश चौक या मुख्य रस्त्या मध्ये बेट नसल्यामुळे वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांमध्ये संभ्रमामुळे तिथे अपघात होत आहे म्हणून या चौकांमध्ये बेट करावे म्हणून ( उप अभियंता ) प्रशांत कोतकर यांना लेखी निवेदन दिले.त्यानंतर त्यांनी लवकरच काम चालू होईल याचे आश्वासन दिले.
त्याप्रसंगी प्रशांत कोतकर ( उप अभियंता ),शोएब शेख ( उप अभियंता ),सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे,गिरीश देवकाते,तौफिक सय्यद,रमेश चौधरी,अमोल जगताप,रोहित राऊत उपस्थित होते.








