शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुलांनी ॲक्रोबॅटीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य खाडे, अनय पवार, राजवीर अजूरे आणि पवन खैरवार यांचा विजयी संघामध्ये समावेश होता. या विजयामुळे या संघाची निवड नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत झाली आहे.
कर्वेनगर, पुणे येथे झालेल्या या पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पुणे ग्रामीण, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर ग्रामीण, अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर ग्रामीण येथील विविध शालेय संघांनी सहभाग घेतला होता.
याच ॲक्रोबॅटीक स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या आर्या थोरात, वैदेही निकम, वीरा काटकर, यांनी मुली ट्रायो गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ओम पाटील, सावनी बडवे यांनी मिश्र जोडी मध्ये द्वितीय क्रमांक आणि अमित कोडगाणुरा आणि रुद्र जंगलीवाड यांनी मुलांच्या जोडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
प्राचार्य डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्य पद्मावती बंडा, क्रीडा शिक्षक धनाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
पीसीईटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.








