पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी :
पिंपरी, दि. १४ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त चिंचवड स्टेशन येथील लहूजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी सदस्य तथा प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार सीमाताई चव्हाण यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे निमित्ताने सीमाताई चव्हाण व माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी नगरसदस्य मारूती भापकर, सुनील कदम,माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब रसाळ, लहूजी वस्ताद साळवे जयंती समितीचे अध्यक्ष गणेश करवले, जेजुरी देवस्थान समितीचे विश्वस्त अनिल सौंदाडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे,संदीपान झोंबाडे, संजय ससाणे,अरूण जोगदंड, युवराज दाखले, सतीश भवाळ, नाना कसबे, सुरेश कांबळे, संजय धुतडमल, मनोज तोरडमल, सुनील भिसे, नितीन घोलप,नाना कांबळे, सविता आव्हाड,अविनाश शिंदे, राजू आवाळे,मयूर जाधव, शिवाजी साळवे,शंकर कावळे,बाळासाहेब खंदारे, बाळू कुचेकर, लहू अडसूळ, अनिल तांबे, , रवी पारधे,अनिल कांबळे, महादेव अढागळे, आनंद कांबळे, दादू भवर, नेताजी शिंदे, नाथा शिंदे, चंद्रकांत शिंदे, सुभाष लांडगे, रामा पवार, स्वप्नील मोहिते, विठ्ठल शिंदे, आकाश शिंदे, दीपक भंडारी, पांडुरंग पाटोळे, विलास लांडगे,मनीषा शिंदे, वैशाली जाधव, उषा कांबळे, राधिका अडागळे यांच्यासह जयंती उत्सव समितीचे सदस्य तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








