पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी :
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस 27 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारणी चिटणीस सौ. कविता ताई भोंगाळे पाटील यांच्या पुढाकाराने कविताताई भोंगाळे युवा मंच व गायत्री सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 नोव्हेंबर रोजी, विदर्भ मित्र मंडळ सभागृह, गुरुकृपा कॉलनी, सिद्धेश्वर शाळेजवळ, भोसरी येथे मोफत नेत्र तपासणी ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिर सकाळी दहा ते पाच या वेळेत संपन्न होत आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर याचा लाभ घ्यावा तसेच जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन कविताताई भोंगाळे पाटील यांनी केले आहे.








