spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिका निवडणुकीसाठी विठ्ठल उर्फ नाना काटे यांची प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आगामी पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी विठ्ठल उर्फ नाना काटे यांची प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी अजित पवार व सुनील तटकरे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
त्यांच्या नेतृत्वाची दिशा, विकासदृष्टिकोन, पक्षाची विचारधारा आणि जनतेचा विश्वास या बळावर पक्षासाठी प्रभावी, सकारात्मक आणि संघटित प्रचारयोजना उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

काटे यांनी सांगितले की, “आमच्यावर ठेवलेला पक्षनेतृत्वाचा विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भक्कम विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करू. पक्षाची खरी शक्ती म्हणजे कार्यकर्ते आणि जनतेचा विश्वास — या बळावर आपण आगामी निवडणूक यशस्वीपणे लढवू.”

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरअध्यक्ष, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पक्षाची विचारधारा मानणारे विविध नागरिक यांना सोबत घेऊन शहरातील विकासाची गती वेगवान करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी पुनरुच्चारित केला.

“विकासाची वाटचाल होणार सुरू…” या संदेशाने त्यांनी आगामी निवडणुकीबाबत पक्षाचे धोरण आणि बांधिलकी अधोरेखित केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!