पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी :
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. या बाल दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेविका प्रियंका ताई प्रवीण बारसे यांनी वय वर्षे पाच ते वय वर्ष 17 पर्यंतच्या मुला मुलींचे आधार कार्ड अपडेट हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविला.
भोसरी मधील आदर्श शिक्षण संस्था येथे सदर आधार कार्ड अपडेट शिबिर संपन्न झाले प्रभाग क्रमांक पाच मधील मुला मुलींसाठी सदर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. आधार कार्ड अपडेट करिता येथील मुला मुलींना ई प्रभागात किंवा लांडेवाडी या ठिकाणी जावे लागत होते कधी कधी कागदपत्र पूर्ण नसल्याने त्यांना परत यावे लागते परंतु आपल्या प्रभागातच ही आधार कार्ड अपडेट ची सोय केल्याने अनेकांना या शिबिराचा लाभ घेता आला.

सकाळी नऊ वाजल्यापासून परिसरातील पालक वर्ग आपल्या मुलांना घेऊन या शिबिराचा लाभ घेत आहेत हे शिबिर आयोजित केल्याने पालक वर्गाला ई प्रभागात किंवा लांडेवाडी ला जावे लागते कधी कधी कागदपत्र नसल्याने त्यांना परत यावे लागते परंतु प्रभागातच जवळच्या जवळ ही सोय झाल्याने आणि लगेचच काम होत असल्याने मुलांना उन्हाचे बाहेर न्यावे लागत नसल्याने पालक वर्ग खुश झाला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर चालू राहणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे प्रियांका बारसे यांनी आवाहन केले आहे.
बालदिन निमित्ताने छोट्या मुलां साठी संगीत खुर्ची स्पर्धा

माजी नगरसेविका प्रियंका ताई प्रवीण बारसे यांनी बालदिन निमित्ताने छोट्या मुलां साठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित केली या लहान मुलामुली सोबत बालदिन साजरा केला.या वेळी प्रथम तीन क्रमांकांना बक्षीस दिले व मुलांना खाऊ वाटप केले .
भगवान बिरसा मुंडा जन्म शताब्दीनिमित्त आदिवासी नृत्य सादर करुन जनजाती गौरव पंधरवडा साजरा केला जातो वेळी उपस्थित राहुन माजी नगरसेविका प्रियंका ताई प्रवीण बारसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.








