spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीची बैठक भोसरी एमआयडीसी येथे संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीची आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अभय भोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उद्योजक कामगार आणि कार्यकर्ते मूलभूत हक्क मिळविण्यासाठी निवडणुकीत उभे राहणार
शहरातील वाढत्या नागरी समस्या, उद्योगांचे संरक्षण, रोजगार निर्मिती आणि स्थानिकांच्या हक्कांचे प्रश्न या बैठकीत प्रमुखतेने चर्चिले गेले.

बैठकीतील प्रमुख निर्णय

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी तर्फे उमेदवार उभे राहणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. शहराचा निर्णय शहरातील लोकांनी घ्यावा हा हेतू यामागे आहे.
  • प्रत्येक प्रभागात छोटे-मोठे स्टार्टअप उद्योग उभारण्याची योजना आखण्यात आली. यामुळे महिलांना घराजवळच रोजगार उपलब्ध होईल.
  • शहरातील युवक–युवतींसाठी प्रत्येक भागात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, ज्यामुळे रोजगारक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.
  • शासनाने घेतलेल्या स्थानिकांच्या जमिनी, सर्वेक्षणातील तफावत, नुकसानभरपाईतील अन्याय या सर्व विषयांवर आघाडी सक्त भूमिका मांडणार आहे.
  • रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूककोंडी, सार्वजनिक सुविधा, वाढते प्रदूषण अशा मूलभूत नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
  • कामगार हक्क, महिला सुरक्षा आणि ज्येष्ठ नागरिक–खेळाडूंना सुविधा यासाठी स्वतंत्र उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.

    बैठकीला फुगेवाडी, दापोडी, भोसरी, दिघी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, काळेवाडी, मोशी, कासारवाडी आदी भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

    अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले की, शहराला पुन्हा औद्योगिक ओळख मिळवून देण्यासाठी, आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच विकास आघाडी आता थेट निवडणुकीत उतरत आहे.”

    आगामी काळात महानगरपालिका निवडणुकीचा सविस्तर आराखडा जाहीर करण्यासाठी दुसरी बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे शरविकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!