- संदेश सुरेशजी गादिया निवडणूक लढण्यास तयार
- भा.ज.प. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी देईल असा आत्मविश्वास
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक तब्बल चार वर्षाच्या प्रशासकीय कालावधीनंतर येत्या दोन महिन्यात संपन्न होत आहे. या महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातील आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली. या आरक्षण सोडती मध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांना धक्का बसला असून त्यांचे राजकीय भवितव्य अडचणीत आले आहे. अशातच इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतीय जनता पक्ष हा पिंपरी चिंचवड शहरातील एक नंबरचा पक्ष झाला असून या भाजपमधूनच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने वाढली आहे . अशातच प्रभाग क्रमांक 14 मध्ये जैन समाजातून येणारे संदेश सुरेशजी गादिया हे सुशिक्षित इच्छुक उमेदवार पुढे आले आहे.
आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये अ) ओबीसी, ब) महिला सर्वसाधारण, क) महिला सर्वसाधारण, आणि ड) अ राखीव अशी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या आरक्षण सोडती मध्ये खुल्या प्रवर्गातून संदेश सुरेश जी गादिया हे इच्छुक आहेत.
संदेश सुरेश जी गादिया यांना त्यांच्या कुटुंबीयांमधूनच अगदी लहान वयामध्ये सामाजिक व राजकीय कार्याचे बाळकडू मिळाले आहे. त्यांचे वडील कै. सुरेशजी गादिया हे पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी तीस-पस्तीस वर्षे भारतीय जनता पक्ष शहरात वाढविण्यासाठी अथक परिश्रम केले. लहानपणापासूनच भारतीय जनता पक्षाचे काम व आपले पिंपरी चिंचवड शहर याचा संपूर्ण अभ्यास संदेश गादिया यांना आहे.
संदेश गादिया हे जैन समाजातून एकमेव इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहे. संदेश गादिया हे अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत, सुरेश गादिया मेमोरियल फाउंडेशन, पिंपरी चिंचवड जैन महासंघ, गणेश गणपती मंडळ, सुदर्शन मित्रमंडळ, भारतीय जैन संघटना अशा विविध सामाजिक संस्थेवर सामाजिक काम करण्याचा अनुभव संदेश गादिया यांना आहे.
संदेश गादिया हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा संयोजक पदी कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वीच चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासूनच संदेश गादिया हे दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये संदेश गादिया यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत, त्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड ही आरोग्यदायी योजना त्यांनी प्रभावीपणे राबविली, तसेच रक्तदान शिबिर असो आरोग्य शिबिर असो हे अनेक वर्षापासून संदेश गादिया राबवित आले आहेत. तसेच डॉक्टर आपल्या दारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने राबविण्यात येणारे स्वच्छता मोहिमेमध्ये संदेश गदिया यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर स्वच्छता कामगारांचा सत्कार समारंभ त्यांनी आयोजित केला . तसेच वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविले आहेत, जैन समाजाचा मेळावा मोठ्या प्रमाणात आयोजित करून यशस्वी करून दाखविला आहेत, प्रामुख्याने भगवान महावीर चौक येथे अहिंसास्तंभ उभारणी करिता प्रशासनाशी पाठपुरावा करत काम मार्गी लावण्यात संदेश गादिया यांना यश आले.
आता आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी संदेश गादिया हे तीव्र इच्छुक असून त्यांनी आपली इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठीकडूनही सकारात्मकता मिळाली आहे. संदेश गादिया यांना पक्षश्रेष्ठींवर विश्वास असून भारतीय जनता पक्ष हा सर्व समाजातील घटकांना न्याय देणारा पक्ष आहे . त्यामुळे आपल्याला नक्कीच प्रभाग क्रमांक 14 मध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी देईल असा ठाम आत्मविश्वास संदेश सुरेशजी गादिया यांनी व्यक्त केला आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी संदेश गादिया हे तयारी करत असून आपण पूर्ण ताकतीने सदर निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे.









