शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे शहरातील नवले ब्रीज येथे आज पाच वाजण्याच्या सुमारास सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणार्या कंटेनर, ट्रक आणि चार चाकी वाहन एकमेकांवर आदळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये ट्रक आणि कंटेनरला आग लागली असून या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून दहा पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यातील जखमी नागरिकांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघातामध्ये तीन ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या लोकांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत ३ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर सातत्याने अपघात झाल्याच्या घटना पाहायला मिळतात.
अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. तर अपघाताच्या घटनेमुळे दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथील फुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर गाडीने समोरील दुचाकी चालकाला उडवले. या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. खंडु नारायण बनसुडे (वय ३५)व रूद्र खंडु बनसुडे (वय दोघेही रा. पळसदेव ता. इंदापूर जि. पुणे) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवारी ( दि. २)पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ हद्दीत चँनेल नं ७४+२०० चे ब्रिझ जवळ सायंकाळी पावणेसहा वाजता घडला.








