spot_img
spot_img
spot_img

मोरवाडी येथील चुकीचे डिव्हायडर व फूटपाथ हटवले; भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनाला यश – डॉ. बाबा कांबळे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोरवाडी (पिंपरी-चिंचवड) येथे महानगरपालिकेच्या वतीने अशास्त्रीय व चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेले डिव्हायडर व अतिविस्तारीत फूटपाथ यामुळे रस्त्याचा गळा आवळला गेला होता. यामुळे वाहतूक कोंडी, रिक्षा चालक व फेरीवाल्यांना प्रचंड त्रास, तसेच सर्वसामान्य नागरिकांना चालण्यास अडथळा निर्माण झाला होता. या भ्रष्टाचाराच्या कुरणावर बोट ठेवत डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी जनता आघाडी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता.

या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता संयुक्त पाहणी आयोजित केली. या पाहणीत महानगरपालिका अधिकारी, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, डॉ. बाबा कांबळे व त्यांचे कार्यकर्ते, तसेच महाराष्ट्र रिक्षा पंचायत व कष्टकरी जनता आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

संयुक्त पाहणीत डिव्हायडर पूर्णपणे हटवणे व फूटपाथचा आकार योग्य प्रमाणात कमी करणे, यावर सर्वस्तरांवर एकमत* झाले. त्यानुसार महानगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करीत चुकीचे डिव्हायडर व फूटपाथ हटवले. यामुळे रस्ता पूर्ववत रुंद झाला असून वाहतुकीला शिस्त व नागरिकांना सुरक्षित चालण्यास मार्ग मोकळा झाला आहे.

डॉ. बाबा कांबळे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटले, “फूटपाथ व डिव्हायडर हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले होते. चुकीच्या पद्धतीने टाकलेले हे अडथळे हटवल्याने भ्रष्टाचारावर पायबंद घालण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काळातही भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणी आवाज उठवत राहू. हा कष्टकरी जनतेचा विजय आहे. रिक्षा चालक, फेरीवाले व सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष सुरू राहील.

या यशस्वी आंदोलनामुळे रिक्षा चालक, फेरीवाले व स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण* आहे. अनेकांनी डॉ. बाबा कांबळे यांचे आभार मानले असून, “आमच्या आवाजाला न्याय मिळाला” अशी भावना व्यक्त केली आहे.

  • मागण्या पूर्ण झाल्याचे मुख्य मुद्दे : –
  • चुकीचे डिव्हायडर पूर्णपणे हटवले
  • फूटपाथचा आकार योग्य प्रमाणात कमी केला
  • वाहतूक कोंडी दूर, रस्ता रुंद व सुरक्षित
  • भ्रष्टाचारावर आंदोलनाचा ठोस परिणाम

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!