विठ्ठल भोईर व सौ पल्लवी भोईर यांच्या पुढाकाराने महाआरोग्य शिबिर
शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील व प्रभाग समिती स्वीकृत नगर सदस्य विठ्ठल बबन भोईर व सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या पुढाकाराने नमो महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिर शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर सकाळी दहा ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपन्न होत आहे.
या शिबिरात जनरल हेल्थ चेकअप, बालरोग, डोळे तपासणी, ओरल कॅन्सर तपासणी, दंतचिकित्सा, बोन मिनरल डेन्सिटी, या आरोग्य तपासणी सोबतच भव्य रक्कम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने अवयव दान जागृता मोहीम राबविण्यात येत आहे, याचीही नोंदणी या शिबिराच्या अंतर्गत होणार असल्याची माहिती आयोजकांचे वतीने देण्यात आली आहे. सर्व आरोग्य शिबिराच्या तपासण्या या मोफत होणार असून, या शिबिरात 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी मॅमोग्राफी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर नमो महाआरोग्य शिबिर हे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल व डी वाय पाटील युनिव्हर्सिटी डेंटल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने संपन्न होत आहे. सदर शिबिर मोरया गोसावी स्टेडियम गोयल गरिमा सोसायटी, केशवनगर चिंचवड येथे संपन्न होत असून, या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा व आरोग्याच्या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल भोईर व पल्लवी भोईर यांनी केले आहे.








