शबनम न्यूज , प्रतिनिधी :
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांच्या पुढाकाराने रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रक्तदान करूया गरजूंना जीवदान देऊया,या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करण्याचे आवाहन निखिल बोऱ्हाडे यांनी आपल्या परिसरात केले, त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत 119 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. व हे रक्तदान शिबिर मोठ्या यशस्वीपणे संपन्न झाले.

रक्तदान शिबिरा बरोबरच प्रभाग क्रमांक दोन मधील कुटुंबीयांसाठी नवीन रेशन कार्ड शिबिराचेही आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये एकूण 618 कुटुंबांना रेशन कार्ड ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
हे दोन्ही शिबिर निखिल बोऱ्हाडे यांच्या पुढाकाराने यशस्वीपणे संपन्न झाली. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक समस्या व प्रत्येक अडचणींच्या वेळी धावून जाणारे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांच्यावतीने अनेक वर्षापासून असे सामाजिक उपक्रम राबविले जातात.
निखिल बोऱ्हाडे हे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी करत आहेत, प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांच्या आग्रहाखातर आपण या निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे निखिल बोऱ्हाडे यांनी सांगितले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने संधी मिळाली तर नक्कीच आपण या प्रभाग क्रमांक दोन मधून प्रभागाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहोत असेही निखिल बोऱ्हाडे यांनी सांगितले आहे.








