spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी ‘आरटीआय’ कार्यकर्ते अमित कांबळे यांचा ‘आप’मध्ये जाहीर प्रवेश!

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील एक जुने आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, तसेच सक्रिय आरटीआय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अमित कांबळे यांनी आज पिंपरी चिंचवडमधील आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पिंपळे निलख आणि विशाल नगर परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अमित कांबळे यांच्या प्रवेशामुळे ‘आप’च्या पिंपरी चिंचवडमधील कार्याला नवी ऊर्जा मिळणार आहे.
हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पुणे मध्यवर्ती कार्यालय, येथे संपन्न झाला. ‘आप’चे राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित पाटील यांच्या हस्ते कांबळे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदेश समन्वयक अमित मस्के आणि प्रदेश सचिव अभिजीत मोरे हे देखील उपस्थित होते.
‘आप’मध्ये प्रवेश केल्यानंतर अमित कांबळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, “केजरीवाल मॉडेलचे शिक्षण, आरोग्य आणि पारदर्शक प्रशासन मी जवळून पाहिले आहे. पिंपरी चिंचवड शहरात उत्तम प्रशासन, पारदर्शकता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मी गेली अनेक वर्षे काम करत आहे. आता ‘आप’च्या प्रामाणिक आणि विकासवादी राजकारणातून हे ध्येय साध्य करण्याची मला खात्री आहे. या नव्या प्रवासासाठी मी अत्यंत उत्सुक आहे आणि उत्साहाने काम करण्यास सज्ज आहे.”
यावेळी बोलताना अजित पाटील यांनी, “अमित कांबळे यांच्यासारख्या जिद्दीने काम करणाऱ्या आणि पारदर्शकतेची तळमळ असलेल्या कार्यकर्त्याचा ‘आप’मध्ये समावेश होणे हे पक्षासाठी बळ देणारे आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग शहर विकासासाठी निश्चितच होईल. 
अमित कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमधील आरटीआय चळवळ आणि स्थानिक सामाजिक प्रश्नांवरील लढा अधिक मजबूत होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!