शबनम न्यूज | प्रतिनिधी
आज सोमवार दि.१० नोव्हेंबर २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख नेते मंडळी, पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील एकूण १९१ पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, विठ्ठल उर्फ नाना काटे, अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, राहुल भोसले, श्याम लांडे, शेख, कविता आल्हाट, संतोष बारणे, कैलास बारणे, सतीश दरेकर, ज्ञानेश्वर कांबळे, प्रकाश सोमवंशी, काळूराम पवार, वर्षा जगताप, संजय औसरमल, राजेंद्र सिंग वालिया, दीपक साकोरे, माऊली मोरे, रवींद्र ओव्हाळ, महेश झपके, संपत पाचुंदकर, राकेश गुरव, धनाजी तांबे इत्यादी उपस्थित होते.








