spot_img
spot_img
spot_img

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा ; निखिल दळवी यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील दत्तवाडी, विठ्ठलवाडी, खंडेराया भाजी मंडई, विवेक नगर, तुळजाई वस्ती, भंगारवाडी, टेल्को कपूर कॉलनी, काळभोर नगर, रामनगर, खडीमशीन परिसर, मोहन नगर ,फुलेनगर ,गवळीवाडा ,चिंचवड स्टेशन या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्याचे प्रमाण वाढले आहे. याचे त्रास रहिवासी नागरिकांना होत आहेत, या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यास देखील धोका निर्माण होत आहे. याकरिता या सार्वजनिक परिसरातील भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख निखिल दळवी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना केली आहे.

निखिल दळवी यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त यांना मागणी केली असून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 14 परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे. ही भटकी कुत्री रात्री येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या गाडीचे मागे धावतात, लहान मुलांच्या मागे पळतात व चावतात तसेच नागरिकांच्या गाडी मागे धावतात, या भटक्या कुत्र्यांचा त्रास रहिवासी नागरिकांना होत असून, त्यांच्या आरोग्यास देखील हानी पोहोचत आहे. रहिवासी नागरिकांचे आरोग्य धोका देऊ शकते. नागरिकांना मोठी इजा होऊ शकते, याची शक्यता नाकारता येणार नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने सर्व महानगरपालिकांना आदेश दिले आहे की, सार्वजनिक ठिकाणावरील सर्व भटक्या कुत्र्यांना बंदिस्त करून त्यांचा बंदोबस्त करावा.

तसेच प्रभाग क्रमांक 14 मधील येणाऱ्या सर्व परिसरात व भागांमधील सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना स्थलांतरित करून बंदिस्त करावे, जेणेकरून स्थानिक रहिवासी नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून वाचता येईल व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना धोका होणार नाही, तरी लवकरात लवकर प्रभाग क्रमांक 14 मधील सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या सर्व भटके कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!