शबनम न्यूज | प्रतिनिधी
श्री दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशनच्या वतीने समीर लॉन्स,रावेत येथील केंद्रीय विद्यालय देहूरोड मधील केंद्रीय विद्यालय न.१ आणि केंद्रीय विद्यालय नं.२ देहूरोड यांच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत या स्नेहसंमेलनाला उपस्थिती लावली होती. सुमारे ७०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच अनेक माजी शिक्षकांनीही उपस्थिती लावली होती. अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटल्यानंतर चा एक आनंद आणि उत्साह या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. काही विद्यार्थ्यांसाठी हे भाऊक करणारे क्षणी होते. या ठिकाणी दिपक भोंडवे यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.
अनेकांनी शाळे जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना जुन्या आठवणी सांगितल्या. दिपक भोंडवे यांनी बोलताना या तंत्रज्ञानाच्या व सोशल मीडिया युगात एकमेकाला आपुलकीने इतक्या वर्षानंतर भेटण्याचा आनंद हा आगळावेगळा असतो. तरुण पिढींना बघून मलाही माझे शालेय जीवन आठवले असे मनोगत दिपक भोंडवे यांनी व्यक्त केले. या ठिकाणी अनेक संगीतात्मक गायनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले होते. माजी शिक्षक श्री देवरे सर, श्री ललित खंडेलवाल, श्री उज्वल आवारे, श्रीमती आशा शर्मा, सुश्री श्रद्धा चव्हाण, श्रीमती बिंदू अनिल कुमार, श्री एस बी सिंग व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री देवरे आणि श्रद्धा चव्हाण आणि बिंदू अनिल कुमार यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जुन्या आठवणी साज्या केल्या.
उपस्थित सर्व शिक्षकांनी श्री दीपक भोंडवे यांचे आभार मानत त्यांचे सत्कार केले.
या भव्य 16 आयोजनासाठी सर्व विद्यार्थ्यांनी दीपक भोंडवे यांचे मनःपूर्वक आभार मानले.








