शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, संवेदनशीलता आणि मानवतावादी दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व शैक्षणिक शाखांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) अॅप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभाग तसेच एफइएसए आणि लाइफ स्किल्स सेल विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पीसीसीओईआर डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ताथवडे मधील निधी प्रेरणा भवन अनाथ आश्रम येथे दीपोत्सव साजरा केला.
यावेळी विभागप्रमुख प्रा. शीतल पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रिया ओघे, प्रा. निलेश ठुबे, विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ निकुंभ, अर्थव देशमुख, राजवर्धन शितोळे, वेदका पाटील, सौम्या बु्कने, जिया आवटे, प्रणिता माणे, सनाथकुमार पोल, श्लोक पाटील, पुर्वेश चाटे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा वापर करून आकाश कंदिल व हाताने रंगवलेले दिवे तयार केले होते. या वस्तूंची विक्री त्यांनी “दीपोत्सव” या उपक्रमातून केली होती. यामधून जमा झालेला निधी प्रेरणा भवन अनाथ आश्रम, ताथवडे आणि पिंपरी चिंचवड येथील वृध्दांना देणगी स्वरूपात देण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या वतीने धान्य, किराणा साहित्य, मिठाई आणि इतर आवश्यक वस्तू आश्रमात देण्यात आल्या.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आश्रमातील अनाथ मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच पीसीसीओईआर च्या या उपक्रमाचे कौतुक केले.








