शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स कॅम्प असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून तसेच यशराज मार्शल आर्ट संस्थेच्या वतीने केंपो जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना संकल्प सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बापू कातळे यांच्या हस्ते सुवर्ण रोप्य व कांस्यपदक देण्यात आले.
सदर स्पर्धेत पिंपरी चिंचवड, देहू रोड, तळेगाव या परिसरातून अनेक विद्यार्थी, पालक उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष नितीन वैरागर, धनश्री वैरागर, ओमकार लुमध्ये , यशराज आयशा सिंग, अर्निका काकडे, दिनेश दांगट कीर्ती जयकुमार, अनन्य वेताळ, श्रेया राठोड, आलायना खेर ,संदेश वैरागर यांनी केले असून, ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी विद्यार्थ्यांना अनेक पालकांचे मार्गदर्शन लाभले.








