पिंपरी चिंचवड, 9 नोव्हेंबर 2028
१८०० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याविरोधात आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहराने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ‘आप’ने थेट सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल करत, या सरकारला ‘भूखंड माफिया, जमीन दलाल, भू-स्मगलर आणि जमीन लुटारूंचे सरकार’ असे संबोधले आहे. हा घोटाळा सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशांची आणि शहराच्या विकासाची लूट असल्याचा ‘आप’ चे ठाम मत आहे.
या घोटाळ्याला कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, ‘आप’ने दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत: पहिली मागणी म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. आणि दुसरी मागणी म्हणजे, पार्थ पवार यांच्यावर त्वरित अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. जनतेच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी हा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार ‘आप’ने केला आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम आदमी पार्टी शांत बसणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे.
हे तीव्र जनआंदोलन ०९ नोव्हेंबर २०२५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी -१८ येथे करण्यात आले आहे. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात नागरिक देखिल मोठ्या संख्येने सहभागी होते. आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.








