इंग्लंड मधील नामांकित विद्यापीठांसोबत सामंजस्य करार
पिंपरी, पुणे (दि. ०९ नोव्हेंबर २०२५) भारत सरकार आणि इंग्लंड सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, संशोधन क्षेत्रामध्ये अनेक प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्या मार्गदर्शनाखाली या देशांमधील शिक्षण, संशोधन आणि औद्योगिक प्रकल्पांना वेगाने चालना मिळत आहे. त्या अंतर्गत भारतातील पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि इंग्लंड मधील नामांकित विद्यापीठांमध्ये सुरू झालेला “अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन” हा उपक्रम दीपस्तंभ ठरेल असा विश्वास नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अल्युमनी युनियन, यूके (एनआयएसएयू) च्या संस्थापक अध्यक्ष सनम अरोरा यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे भारत आणि इंग्लंड शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अल्युमनी युनियन, यूके (एनआयएसएयू) आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात इंग्लंड मधील अग्रगण्य वीस विद्यापीठांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि परदेशातील भारतीय माजी विद्यार्थी तसेच पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीयू आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर, औद्योगिक व शैक्षणिक संस्था संबंध संचालक डॉ. प्रणव चरखा, आर अँड डी संचालक भरत काळे, कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी, पीसीईटी युरोपियन स्टडी सेंटर प्रमुख डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, युके सल्लागार डॉ. निरुपमा, वेस्ट इंडिया ब्रिटिश कौन्सिलच्या राशी जैन, प्रतिनिधी अनुश्री चौधरी, एनएमआयटी तळेगाव चे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
उच्च शिक्षणाबाबत विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये विशाल दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. त्यांच्यामध्ये शैक्षणिक समृद्धता तसेच औद्योगिक रोजगार क्षमता विकसित व्हावी यासाठी पीसीयू मध्ये विविध आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपक्रम राबविले जातात. इंग्लंडमधील विद्यापीठांसोबत सुरू केलेला हा उपक्रम शिक्षण, संशोधनाची पायाभरणी आहे. यातून जागतिक दर्जाच्या शिक्षण प्रणालीचा उत्कृष्ट अनुभव मिळेल असे पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले.
पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, अशा जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सहकार्य उपक्रमामुळे पीसीयू मधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या व रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध होतील.
पीसीयू आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर यांनी सांगितले की, विद्यार्थी व प्राध्यापक एक्सचेंज प्रोग्राम, संयुक्त संशोधन आणि जागतिक शिक्षणाच्या संधी यामध्ये आता वाढ होईल. ‘अचिव्हर्स डायलॉग्स’ हा एनआयएसएयू आणि ब्रिटिश कौन्सिल इंडियाच्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमातून भारत व इंग्लंड मधील शैक्षणिक, उद्योग आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन मिळेल.
डॉ. अनुपमा आणि अनुश्री चौधरी यांनी स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्राम, कल्चरल एज्युकेशन रिलेशन याबाबत माहिती दिली.
यावेळी इंग्लंड मधील विविध विद्यापीठ व पीसीयु यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले. तसेच ब्लूमबर्ग युनिव्हर्सिटी सोबत शॉर्ट-टर्म शैक्षणिक प्रोग्राम्स, स्कॉटलंड विद्यापीठां सोबत फार्मास्युटिकल सायन्सेसमधील भागीदारी, युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर सोबत इएसजी उपक्रम, युनिव्हर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टन सोबत ब्लॉकचेन व ड्रोन टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट्स, नॉर्दर्न आयर्लंड युनिव्हर्सिटीज सोबत प्रादेशिक सहकार्य आणि इम्पीरियल कॉलेज लंडन सोबत विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष क्षेत्रातील उपक्रम याबाबत चर्चासत्रे झाली.
इम्पीरियल कॉलेज ऑफ लंडन, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन, किंग्स कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टन, युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो, युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज, युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन, स्वान्सी युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड, युनिव्हर्सिटी ऑफ लीसेस्टर, युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफर्डशायर, युनिव्हर्सिटी ऑफ एसेक्स, ब्रुनेल युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वूल्व्हरहॅम्प्टन या इंग्लंड मधील नामांकित विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, पीसीयू व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू संतोष सोनवणे, पीसीओईचे प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, पीसीयू आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.








