spot_img
spot_img
spot_img

वाकड ते मामुर्डी रस्ता होणार ‘सुसाट’!

आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची आढावा बैठक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 चिंचवड मतदार संघातून जाणारा मुंबई बंगळुरूमहामार्गावरील  वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील सेवा रस्त्या संदर्भातील  कामांसाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. या सेवा रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. आवश्यक ठिकाणी जागा हस्तांतरित करून मूलभूत सेवा सुविधांची विकास कामे देखील पूर्ण करावी अशा सूचना देखील आमदार शंकर जगताप यांनी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुळा नदी ते भुमकर चौक आणि भुमकर चौक ते मुळा नदी हा गोल सर्कल हा मार्ग प्राधान्याने पूर्ण केला जावा . यामधील पावसाळी पाणी निचरा, सांडपाणी निचरा व्यवस्था, विविध सेवा वाहिन्यांसाठी डक्ट सुविधा तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे यांसारख्या सूचना देखील आमदार जगताप यांनी दिल्या आहेत.

चिंचवड मतदार संघातील पिंपळे गुरव येथील कार्यालयात आमदार शंकर जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यावेळी वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि विकासनगर या  भागातील सेवा रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी आमदार जगताप यांनी दिले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, तांत्रिक व्यवस्थापक अंकित यादव, कार्यकारी अभियंता सुभाष घंटे, समन्वयक विनोद पाटील, तसेच हरिंद्र यादव आदी उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले, चिंचवड मतदार संघात येणाऱ्या  ताथवडे, पुनावळे, रावेत, वाकड परिसराची देखील झपाट्‌याने वाढ झाली आहे.  या परिसरात अनेक आयटी कंपन्या व मोठ्या रहिवासी सोसायटी आहेत. त्यातच हा परिसर हिंजवडी आयटी पार्कला लागून असल्याने नागरिक या परिसरात वास्तव्यास पसंती देत आहेत.  येथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.  पुनावळे, ताथवडे, वाकड येथील सब वे , मुंबई बेंगलोर हायवे लगत असणारा सर्व्हिस रस्ता हा या परिसरातील  शालेय विद्यार्थी, आयटी, व औद्योगिक कामगार वर्ग, महिला, जेष्ठ नागरिक यांच्या रोजच्या प्रवासासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने आजची बैठक घेण्यात आली. चिंचवड मतदार संघातून जाणारा मुंबई- बंगळुरू महामार्ग आणि सेवा रस्ता हा राज्य शासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. येथील सबवे व रस्ता राज्य शासन व  केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (मॉर्थ) यांच्या कार्यक्षेत्रात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन सूचना केल्या.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, भुमकर चौक ते ताथवडे , ताथवडे ते पुनावळे अंडरपास येथील सेवा रस्त्यांचे तात्काळ डांबरीकरण करून देण्यात यावे. या माध्यमातून वाहतूक सुरळीत राहील आणि नागरिकांना कोणतेही प्रकारचा त्रास आणि वाहतूक कोंडी होणार नाही. रस्ते चांगले असल्यास येथील वाहतुकीचा स्पीड देखील वाढेल.येथील  रस्त्यांच्या कामांसाठी ज्या जागा अद्याप ताब्यात आलेल्या नाही यासंदर्भात जागामालक शेतकरी यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत या जागामालकांनी चर्चा केली असून, भूसंपादनाचा विषय देखील मार्गी लावण्यात आला आहे. या रस्त्यांची गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाची राखण्यात यावी.  पुढील पन्नास वर्षाचे व्हिजन या कामांसाठी दिले जावे.  जेणेकरून भविष्यात वारंवार रस्त्यांच्या गुणवत्तेचे प्रश्न उपस्थित राहू नये असे अशा सक्त सूचना  केल्या असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.  पुनावळे, ताथवडे, वाकड अंडरपास येथे “बॉक्स पुशअप” बसवण्यासंदर्भात तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येणार आहे, त्यानंतर तातडीने निविदा काढून हे काम पूर्ण करण्यात येईल असे देखील जगताप यांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!