शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची संवाद बैठक पार पडली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष शेखर अण्णा चिंचवडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी त्यांच्या समवेत चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे उपस्थित होते. निमित्त होते आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद बैठक, पिंपरी चिंचवड शहर भाजप पक्षाच्या वतीने संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत, मागील ८ वर्षांतील प्रभागातील सामाजिक उपक्रम व विकासकामांचा आढावा घेतला, तसेच येणाऱ्या निवडणुकांसाठी आवश्यक दिशा देत मार्गदर्शन केले.








