शबनम न्यूज | प्रतिनिधी
गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.
राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. १० डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, “नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांच्या संदर्भातील मतदार यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. तर, मतदार केंद्र निहाय मतदार याद्या ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत.निगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी एकणू १ कोटी ३ हजार ५७६ मतदार आहेत. यासाठी एकूण १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएम ची व्यवस्था करण्यात आली असून, या निवडणुकांची मतदान प्रक्रिया ईव्हीएम द्वारेच होणार आहे.”








