पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे महाराष्ट्राच्या विधानसभेचा गौरवशाली वारसा सक्षमपणे चालवतील असे अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महायुतीचे सर्व पक्ष व नागरिक यांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी ते बोलत होते.या वेळी आमदार अण्णा बनसोडे व मावळ चे खासदार श्रीरंग बारणे,भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे , आमदार शंकर जगताप , आमदार अमित गोरखे , शहराध्यक्ष योगेश बहेल , आर पी आय च्या चंद्रकांत सोनकांबळे यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अजितपवार यांचा देखील सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी मावळ चे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे,विधानपरिषद आमदार अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश बहेल, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, कामगार नेते इरफान भाई सय्यद , राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविताताई आल्हाट, माजी महापौर मंगलाताई कदम,माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेविका सुलभाताई उबाळे,प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी पार्टी शहर कार्यकारी अध्यक्ष प्रशांत शितोळे, मोहम्मद भाई पानसरे, अमिना पानसरेआरपीआय शहराध्यक्षा चंद्रकांता ताई सोनकांबळे, मोरेश्वर भोंडवे, वैशाली काळभोर शितल हगवणे, सतीश दरेकर, शाम लांडे,विनोद नढे , प्रसाद शेट्टी ,अतुल शितोळे, मयूर कलाटे, राजू दुर्गे नामदेव ढाके ,शत्रुघन काटे,नागरिक सुजाता पलांडे तसेच महायुतीच्या सर्व पक्षाचे आजी माजी नगरसेवक, विविध सेलचे अध्यक्ष-उपाध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
शरद पवार आजही आमची दैवत
शरद पवार हे आजही आमचे दैवत आहेत असे अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. आज मोदी सारखे सक्षम नेते देशाला मिळाले आहे आणि देशाच्या विकासासाठी आपण नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे आहोत देशाच्या उन्नतीसाठी नरेंद्र मोदी यांना पाठबळ देणं आपलं काम आहे असंही अजित पवार यांनी भाषणाच्या शेवटी सांगितले.
विलास लांडे हे सर्व पक्षीय नेते
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे हे नेमके कोणत्या पक्षाचे आहेत असे मला नेहमी विचारले जाते तेव्हा मी त्यांना सांगतो की विलास लांडे हे सर्वपक्षीय नेते आहेत असे म्हणत अजित पवार यांनी विलास लांडे यांच्यावर भाष्य केले.. व शायरी केली
खामोशी से अपनी मेहनत को अंजाम दो,
खामोशी से अपनी मेहनत को अंजाम दो कामयाबी शोर मचायेगी,
जब नाम होगा रोशन हर एक मुकाम पर
तरी विलास लांडे यांनी तळ्यात मळ्यात न राहता एकच निर्णय घ्यावा असाही सल्ला अजित पवार यांनी विलास लांडे यांना दिला.