spot_img
spot_img
spot_img

चार दिवसांत अनेक घडामोडी;, पण प्रभाग १५ ने दाखवले ‘जहां भरोसा होता है, वहां मौजूदगी की जरूरत नहीं होती!’..

उपस्थिती नव्हे, विश्वासच ठरला ताकदीचा पुरावा; अनुप मोरे यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित..

कार्यकर्ता मेळाव्यात विश्वास, निष्ठा आणि एकतेचा अनोखा संगम…

प्राधिकरण (दि. 02) :- निगडी प्राधिकरणातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्य संयोजक भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. मेळाव्याच्या आमंत्रणपत्रिका आणि बॅनरवर त्यांचे नाव प्रमुख आयोजक आणि मार्गदर्शक म्हणून झळकत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उपस्थितीची अपेक्षा होती. मात्र, कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी जाहीर केले की अपरिहार्य व तांत्रिक कारणास्तव अनुप मोरे उपस्थित राहू शकले नाहीत. मेळाव्याला अनुप मोरे काही तांत्रिक कारणास्तव उपस्थित नसतानाही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तेवढाच उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.

कार्यकर्त्यांच्या घोषणांमधून “अनुप मोरे” यांच्यावरील निष्ठा आणि प्रेम स्पष्टपणे जाणवले. फक्त राजकारणी नव्हे, तर एक तळागाळातील समाजसेवक कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण अनुप मोरे यांच्या कार्यातून दिसून येते. सर्व विरोधक, माध्यम प्रतिनिधी आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध राजकीय पक्षांचे लक्ष या मेळाव्याकडे होते. चार दिवसांत अनेक घडामोडी घडूनही प्रभाग क्रमांक १५ मधील मतदार आणि कार्यकर्त्यांनी “जहां भरोसा होता है, वहां मौजूदगी की जरूरत नहीं होती,” हे दाखवून दिले. विशेष म्हणजे, प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणून हा मेळावा पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलाच असा अनोखा प्रयोग ठरला. अनुपस्थित असूनही कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला. “अनुप मोरे देतील ते उमेदवार आम्हाला मान्य राहतील,” अशी भूमिका इच्छुक उमेदवारांनी स्पष्टपणे मांडली. पक्षाच्या नेत्यांनीही “अनुप मोरे यांनी काळजी करू नये, आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत,” असे सांगून त्यांना ठाम पाठिंबा दिला. या प्रसंगातून अनुप मोरे यांचे प्राधिकरणातील नेतृत्व, लोकप्रियता आणि तळागाळातील पकड पुन्हा अधोरेखित झाली.

दरम्यान भर पावसात उसळलेल्या गर्दीत प्रभाग क्र. १५ (आकुर्डी, निगडी, प्राधिकरण) येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यातून पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले. बुथप्रमुख, शक्तीप्रमुख, महिला, युवा आणि जेष्ठ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

यावेळी आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, महामंत्री मधुकर बच्चे, मंडल अध्यक्ष, प्राधिकरण चिंचवड जयदीप खापरे, भाजपा सचिव राजेंद्र बाबर, माजी महापौर आर.एस. कुमार, विजय शिनकर, सलिम शिकलगार, अरुण थोरात, अतुल इनामदार, समिर जावळकर, उद्योजक संदीप काटे आदी उपस्थित होते.

आमदार उमा खापरे म्हणाल्या, “विरोधकांनी भाजपला लेचेपेचे समजू नये. भाजप हा एकसंघ पक्ष आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हेच आमचे ब्रीद असून, प्रभाग १५ मधील सर्व चारही जागा आम्ही जिंकू.”

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, “हा फक्त प्रभागाचा नव्हे तर शहराचा मेळावा ठरला आहे. अनुप मोरे यांनी पक्षाची प्रतिमा जपली; त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहा.”

आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, “पावसातही कार्यकर्त्यांची उपस्थिती हीच भाजपची खरी ताकद आहे.”

माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांनी प्रभागातील विकासकामांचा उल्लेख करत सांगितले की, “२४x७ पाणी योजना, सांडपाणी प्रकल्प, मेट्रो कामे आणि उद्यान उभारणी भाजपच्या पुढाकाराने साकारली आहेत.”

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!