एसबीपीआयएम मध्ये “झिंग – २०२५” ला उस्फुर्त प्रतिसाद
पिंपरी, पुणे (दि. ९ एप्रिल २०२५) प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक आव्हाने येतात. आव्हानांना सकारात्मक दृष्टीने सामोरे जात यशाचा मागोवा घेत वाटचाल करावी. आयुष्यामध्ये न खचता, न थांबता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वप्नांना गवसणी घालावी, असे मत मिसेस इंडिया २४ या फॅशन शो मधील प्रथम रनरअप सई खलाटे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे ‘झिंग २०२५’ या सांस्कृतिक व व्यावसायिक वैविध्यपूर्ण स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये शिक्षणाबरोबरच अनुभव आणि प्रात्यक्षिक यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना व्यावसायिक, उद्योजक आणि सामाजिक जबाबदारीचे भान रुजवणे, त्यांना व्यवस्थापन आणि संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देणे खूप गरजेचे असते. या उद्देशाने ‘झिंग २०२५’ स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
झिंग २०२५ मध्ये आयपीएल ऑक्शन, ट्रेजर हंट, ग्रुप डान्स, सोलो डान्स, मनोलोग कॉम्पिटिशन, बिझनेस कॉम्पिटिशन, मिस्टर इंडिया डे, असे विविध मॅनेजमेंट गेम्स घेण्यात आले. डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. हिना मुलानी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.