शबनम न्यूज | प्रतिनिधी
सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित “न्यू होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” हा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात यशस्वीपणे पार पडला.
यावेळी मा. आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, मा. नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांनी आपल्या कलागुणांचा आणि आत्मविश्वासाचा सुंदर आविष्कार सादर केला.

स्पर्धेत प्रथम क्रमांक पुष्पा लोकरे, द्वितीय क्रमांक सुनीता सत्यनारायण क्षिरसागर आणि तृतीय क्रमांक निकिता ऋषिकेश राजे यांनी पटकावला. लकी ड्रॉ विजेत्यांमध्ये अमृता संदीप हळदणकर, गजगबाई मुरलीधर काटे, किरण अरुण पपिळ, सोनाली आशुतोष देसले आणि अमृता रामेश्वर दहे यांचा समावेश झाला.
उपस्थित प्रत्येक महिला भगिनींना आकर्षक साडी भेट देण्यात आली आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सुंदर सांगता झाली.महिलांच्या सशक्तीकरणाचा आणि आनंदाचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सचिन साठे यांनी आभार व्यक्त केले.








