spot_img
spot_img
spot_img

उद्योग मदत कक्ष ठप्प – उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी!

महानगरपालिकेचा फक्त देखावा; बैठका न घेतल्यास अभय भोर यांचा आंदोलनाचा इशारा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

एमआयडीसी परिसरातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिकेने स्थापन केलेल्या उद्योग मदत कक्ष या महत्त्वाच्या यंत्रणेला गेल्या कित्येक महिन्यांपासून पूर्णतः ठप्प केल्याने उद्योजकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय सोपानराव भोर यांनी महानगरपालिकेस खडे बोल सुनावत स्पष्ट सवाल केला आहे की,  उद्योग मदत कक्ष हे फक्त देखावा करण्यासाठी होते का?
उद्योजकांना न्याय कधी मिळणार?”

उद्योग कक्षाचा मागणीनुसार प्रारंभ झाला आणि फक्त दोन बैठकांवरच त्याचा प्रवास थांबला! त्या बैठकीत उद्योजकांनी त्यांच्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या —

  • पायाभूत सुविधांची कमतरता
  • रोज उद्भवणाऱ्या स्थानिक समस्या परिसरातील रोड लाईट वाहतुकीच्या समस्या स्पीड ब्रेकर महिला कामगारांना बस सेवा सुविधा उद्यान फूटपाथ गटारे ड्रेनेज लाईन स्वच्छतागृह असे एक ना अनेक समस्यांनी वेढलेली एमआयडीसी आहे.
  • शासकीय यंत्रणांकडून वेळेवर प्रतिसाद नसणे
  • परंतु त्यानंतर एकही आढावा बैठक न घेता त्या सर्व समस्या धुळ खात पडल्या आहेत.
    उद्योगाकडे पूर्ण दुर्लक्ष!

एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना रोज नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अनेक दिवसांपासून उद्योगांसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याची मागणी असतानाही महानगरपालिका पूर्णतः ढिम्म! आता संयम सुटतोय — आंदोलनाचा इशारा!

 अभय भोर यांनी चेतावणी देत म्हटले , उद्योजक म्हणजे शहराच्या अर्थव्यवस्थेची कणा, उद्योगांची कणा मोडण्याचा डाव बंद करा. एमआयडीसी परिसरातील उद्योजकांकडून महानगरपालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर जमा होतो! तरीही पायाभूत सुविधा नाही, प्रशासनाचा प्रतिसाद नाही, उद्योगांचे पैसे कुठे जातात? असा सवाल फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय सोपानराव भोर यांनी संताप व्यक्त केला.

आम्हाला कराच्या पावत्या देतात, पण सुविधांसाठी झुलवत ठेवतात! हा उद्योगांचा अपमान आहे — आर्थिक शोषण आहे!” त्यांचे प्रश्न धाब्यावर बसवणे आम्ही अजिबात सहन करणार नाही! महापालिकेने तातडीने बैठक बोलवावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा प्रसिद्धीपत्राद्वारे देण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!