spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडच्या राजनंदिनीचा नेमबाजीत राज्यस्तरावर ‘कांस्य नेम’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय रायफल प्रशिक्षण अकादमीमधील राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अरुण पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारी नेमबाज कु. राजनंदिनी यादव हिने नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

१९ वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मिळवत राजनंदिनीची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण निर्माण झाला आहे.

राजनंदिनी सध्या प्रशिक्षक अरुण पाडुळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत असून, तिच्या शिस्त, एकाग्रता आणि दृढनिश्चयामुळे तिने अल्पावधीतच आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

या यशामुळे अकादमीमध्ये आनंदाचे वातावरण असून, सहकारी खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींनी राजनंदिनीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. सर्वांना विश्वास आहे की ती राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल.

“राजनंदिनीने अत्यंत शिस्तबद्धपणे आणि सातत्याने सराव करून राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिच्यातील नेमबाजीची जाण आणि एकाग्रता प्रभावी आहे. राष्ट्रीय स्पर्धेत ती आणखी उत्कृष्ट कामगिरी करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

— अरुण पाडुळे, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!