शबनम न्यूज | प्रतिनिधी
अजमेरा सेक्टरमधील एका सोसायटीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे १६ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. पोलिसांनी चोरट्याचा शोध घेत त्यास अटक केली आहे.
तोसिफ अब्दुल हसिफ चौधरी (वय २२, रा. माऊली फ्लोअर मिल, लालटोपीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सागर दिलीप दड्डीकर (वय ३२, रा. मनोज अजमेरा सोसायटी, अजमेरा, पिंपरी) यांनी गुरुवारी (दि. ३०) याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ते २७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान फिर्यादी सागर दड्डीकर व त्यांचा मित्र शिखर श्रीवास्तव हे मूळ गावी दिवाळीसाठी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून १६ हजार ९५० रुपयांची त्यामध्ये घड्याळ, चांदीचे ब्रेसलेट, स्पीकर, गॉगल, परफ्युम, मोबाईल, ट्रिमर, मसाजगन असा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तोसिफ चौधरी याला अटक केली.








