शबनम न्यूज | प्रतिनिधी
कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास किवळे येथील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील हॉटेल रानवारा समोर ही कारवाई करण्यात आली आहे.
अब्दुल्ल आफताब अन्सारी (वय २०, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, धनगरवाडा मंदिरामागे, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रावेत पोलीस ठाण्यातील अंमलदार प्रदीप कामाजी गायकवाड (वय ३५) यांनी गुरुवारी याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी हा हॉटेल रानवारा समोर, पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे लगत असलेल्या किवळे भागात एका ऑटोरिक्षामध्ये बसलेला आढळला. संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ६०० रुपयांचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. हा प्रकार बंदी आदेशाचे उल्लंघन असल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.








