शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे गुरव येथील प्रतिष्ठित नागरिक कालकथित मनीषा अरविंद साळवे यांचे दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पुण्यानुमोदन जलदान विधी तथा अस्थीकलश दर्शनाचा कार्यक्रम दिनांक २ नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता सिद्धार्थ सेवा संघ, बुद्ध विहार, लक्ष्मी नगर गल्ली नंबर एक पिंपळे गुरव पुणे येथे होणार आहे.
मनीषा साळवे या पिंपळे गुरव येथील द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या संस्थापक, सचिव तथा प्राचार्य होत्या. तसेच बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल आणि बुद्धिस्ट स्टार एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अरविंद साळवे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले ,आदित्य व किरण तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील बी आय एस परिवार शोकाकुल आहे.








