spot_img
spot_img
spot_img

महापालिका सेवेतून सह शहर अभियंता, लेखाधिकारी यांच्यासह २२ जण सेवानिवृत्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेत अनेक वर्षे जबाबदारीनेप्रामाणिकपणे कामकाज केलेले आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने महापालिकेचा नावलौकिक वाढविणा-या या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा आदर्श कार्यरत असणा-या कर्मचा-यांनी घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले तसेच सेवानिवृत्तांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

     पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात माहे ऑक्टोबर २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे १२ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले १० अशा एकूण २२ कर्मचा-यांचा अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

     या कार्यक्रमास अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभयचंद्र दादेवार,मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगतापविशेष अधिकारी किरण गायकवाडसहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे,कार्यकारी अभियंता तथा कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अभिमान भोसलेजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकप्रशासन अधिकारी उमा दरवेशकामगार कल्याण विभागातील लिपिक माया वाकडेतसेच महानगरपालिकेचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

     माहे ऑक्टोबर २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवारउपअभियंता महेंद्रसिंह ठाकूरलेखाधिकारी सुरेंद्र देशमुखेमुख्याध्यापिका शाहिदा सय्यदसुनिता मानेकार्यालय अधिक्षक जयश्री कुदळेसिस्टर इनचार्ज हेमलता रायकरमिना संकपाळशिपाई सुभाष भोईरवसंत बेल्हेकरमुकादम धनंजय गंगावणेमजूर भरत डाऊल यांचा समावेश आहे.

 

     तर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवेसफाई कामगार जयश्री मलकेकरशारदा लोळगेलिलाबाई बागडीपुष्पा जगतापमहेश भोसलेहिराबाई धेंडेगीता चावरियाकचरा कुली अरुण पवार आणि गटर कुली अजिनाथ तेलंगे यांचा समावेश आहे.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केलेतर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक आणि आभार किरण गायकवाड यांनी मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!