शबनम न्यूज | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील आरपीआय आठवले गट पिंपरी चिंचवड महिला वाहतूक आघाडी वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच त्यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महिला वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले हे आंदोलन पिंपरी चिंचवड महिला वाहतूक आघाडी संपर्क कार्यालय, अजमेरा चौक येथे करण्यात आले.
या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये अजिज भाई शेख (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक आघाडी आर.पी.आय -आ),श्री विद्यासागर गायकवाड ,सचिव पुणे जिल्हा वाहतूक आघाडी आर.पी.आय.(A),संजना मोरे ,सचिव पुणे जिल्हा महिला वाहतूक आघाडी आर.पी.आय.(A),सौ सुषमा बाळसराफ अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर महिला वाहतूक आघाडी आर.पी.आय.(A),तब्बसूम सय्यद ,कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर महिला वाहतूक आघाडी आर.पी.आय.(A),सौ प्रमिला भोसले,उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर ,महिला वाहतूक आघाडी आर.पी.आय.(A),सौ स्मिता देशपांडे ,अध्यक्ष भोसरी विधानसभा महिला वाहतूक आघाडी आर.पी.आय.(A), रेणुका पिल्ले ,अंजली आडकर ,संगीता पाटील,विनोद चंदमारे ,सलीम सय्यद सल्लागार,पुणे जिल्हा वाहतूक आघाडी आर.पी.आय(आ) यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .








