spot_img
spot_img
spot_img

नकुल भोईर खून प्रकरण: चैतालीने प्रियकरासोबत मिळून केली हत्या! प्रियकराला अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड मध्ये नकुल भोईर या सामाजिक कार्यकर्त्याच्या खून प्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. नकुल ची हत्या नकुलची पत्नी चैताली भोईर हिने केली असल्याचे प्रथम दर्शनी पोलीस तपासात पुढे आले. त्याच्यानंतर आता या प्रकरणात नवीन खुलासा झाला असून, नकुल ची हत्या करण्यात चैताली भोईर सोबत चैताली चा प्रियकर सिद्धार्थ पवार हाही या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचे आता समोर आले आहे.

चैताली भोईर ला पोलिसांनी पहिलेच अटक केली आहे त्यानंतर आता सिद्धार्थ पवार यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

चैताली भोईर चा प्रियकर सिद्धार्थ पवार (वय २१) याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. नकुलची पत्नी चैतालीने नकुलची हत्या केला, याआधी समोर आले होते. चिंचवड पोलीस यांनी सखोल तपास केल्यानंतर चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थने हत्या केल्याचे आता समोर आले आहेत.

23 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी पत्नी चैताली भोईरने आपला पती नकुल भोईरची हत्या केल्याची बातमी पिंपरी चिंचवड शहर मध्ये वाऱ्यासारखी पसरली. या घटनेनंतर चिंचवड मध्ये एकच खळबळ उडाली. आरोपी चैताली भोईरला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर नकुल बद्दल सोशल मीडियावर अनेकांच्या वतीने सहानुभूती व्यक्त होत होती.

चैताली भोईरने आपणच आपल्या पतीची हत्या केल्याचे कबूल केले होते. चारित्र्याच्या संशयावरून वारंवार नकुल हा त्रास देत असल्याने आपण रागाच्या भरात नकुलची हत्या केल्याचे चैतालीने कबूल केले. परंतु, एकटी चैताली नकुल भोईरची हत्या कशी करेल? याबाबत नकुल भोईरच्या कुटुंबियांनी व त्यांच्या आसपास राहणाऱ्या व्यक्तींनी संशय व्यक्त केला होता. नकुलच्या भावाने चैताली विरोधात पोलिसात तक्रार केली होती की ,चैतालीने एकटीनेच नकुल ची हत्या कशी केली असेल? तिच्यासोबत कोणीतरी दुसरा व्यक्ती असेल? असा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली. तसेच तांत्रिक बाबी तपासल्यानंतर सिद्धार्थ पवार हा नकुल भोईरचा मित्र व चैताली भोईरचा प्रियकर या प्रकरणात समोर आला व चैताली भोईर व सिद्धार्थ पवारने मिळूनच नकुलची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ पवारलाही अटक केली आहे.

विशेष म्हणजे सिद्धार्थ पवार हा नकुल भोईरचा मित्र. नकुल भोईरनेच चैताली भोईर सोबत सिद्धार्थ पवार ची ओळख करून दिली. परंतु नकुल च्या नकळत चैताली भोईर व सिद्धार्थ पवार चे प्रेम प्रकरण सुरू झाले. याची कुणकुण नकुलला लागल्यानंतर नकुलने चैताली भोईरला त्या रात्री याबाबत विचारणा, त्यानंतर या दोघात वाद झाला. त्यावेळी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सिद्धार्थ पवारला ही नकुल भोईरने बोलून घेतले होते व सिद्धार्थ पवार च्या समोरच नकुल भोईरणे चैताली भोईरला मारहाण केली. ही मारहाण झाल्यानंतर सिद्धार्थ पवारने ही नकुल भोईरला मारण्यासाठी पुढे आला व या दोघांच्या वादात चैताली भोईरनेही सिद्धार्थ पवार ची मदत केली व या भांडणात नकुल भोईरचा जीव गेला असे एकंदरीत पोलीस तापासात समोर आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!