शबनम न्यूज | प्रतिनिधी
देशाचे लोहपुरूष अशी ओळख असणारे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी ‘सरदार वल्लभभाई पटेल (चरित्र व काळ)’ या पुस्तकावर आधारित विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे पहिले अध्यक्ष स्व. मामासाहेब देवगिरीकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकावर हा परिसंवाद शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक मार्ग पुणे येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित या परिसंवादात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक व ज्येष्ठ लेखक प्रकाश पवार हे प्रमुख वक्ते असणार आहेत. संस्थेचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.








