- धर्मदाय आयुक्तांकडे केली शहरातील सर्व रुग्णालयांच्या चौकशीची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठेपणामुळे तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला धर्मदाय रुग्णालय असूनही तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगितली होती, न भरल्याने पैशाअभावी ही दुर्दैवी घटना घडली. अशी घटना यापुढे घडू नये, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी धर्मदाय आयुक्त यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व धर्मदाय रुग्णालय यांची चौकशी करून अशा रुग्णालयावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे युवा शहर प्रमुख तथा विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल दळवी यांनी धर्मदाय आयुक्त पुणे विभाग यांच्याकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरांमधील सर्व धर्मदाय रुग्णालयांची चौकशी करून नियम व अटींचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या मार्फत धर्मादाय रुग्णालय यांना निर्धन व दुर्बल घटकांसाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णालय क्षमतेच्या ( निर्धन घटकासाठी ) 10 टक्के खाटा (बेड ) व (दुर्बल घटकांसाठी) 10 टक्के खाटा (बेड) हे राखीव ठेवावे त असा नियम आहे व रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात निर्धन व दुर्बल घटकांचे इलाज करावेत असे बंधन धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून घालण्यात आले आहे तरी देखील पिंपरी चिंचवड मधील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये गोरगरीब निर्धन व दुर्बल घटकांचे कोणतेही इलाज मोफत व सवलतीच्या दरात केले जात नाही सर्व पिंपरी चिंचवड शहरा मधील धर्मादाय रुग्णालयाने धंदा मांडला आहे धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या अटी व शर्तींचे नियमाचे पालन या धर्मादाय रुग्णालयान कडून करण्यात येत नाही पिंपरी चिंचवड शहर मधील सर्व धर्मादाय रुग्णालये सर्व रुग्णांकडून पैसे वसूल करून त्यांचे इलाज केले जातात कोणालाही मोफत किंवा सवलतीच्या दरात इलाज पिंपरी चिंचवड शहरा मधील कोणत्याही धर्मादाय रुग्णालयांमध्ये मिळत नाहीत सर्व धर्मादाय रुग्णालयांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे
पिंपरी चिंचवड शहरा मधील धर्मादाय रुग्णालयांमध्ये येणारे अनुभव व त्यांच्या विरोधातील तक्रारी खालील प्रमाणे
१) धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांसाठी मोफत व सवलतीच्या दरात इलाज केले जातात असा बोर्ड प्रमुख दिसला अशा ठिकाणी लावत नाही दिसणार नाही अशा ठिकाणी लपून लावतात जेणेकरून नागरिकांच्या निदर्शनास येणार नाही
२) धर्मादाय रुग्णालयाकडे निर्धन व दुर्बल घटकांच्या धर्मदाय योजनेमध्ये इलाज करायचा आहे अशी मागणी धर्मादाय रुग्णालयाकडे केली असता खाट ( बेड) अवेलेबल नाही जागा नाही अशी सर्व उत्तरे मिळतात रुग्णालयाकडून दिली जातात
३) धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांसाठी मोफत व सवलतीच्या दरात इलाज करण्यासाठी दहा टक्के खाटा (बेड) राखीव ठेवणे बंधनकारक आहे हॉस्पिटलमध्ये गेल्या असतात कोणतेही खाट (बेड )अवेलेबल राखीव ठेवण्यात आलेली नाही असे आमच्या निदर्शनास आले आहे निर्धन व दुर्बल घटकांकरता मोफत व सवलतीच्या दरात खाटा राखीव ठेवण्यात येत नाही
४) धर्मादाय रुग्णालयामध्ये रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी अनामत रक्कम घेतल्याशिवाय ऍडमिट केले जात नाही हाकलून दिले जाते पैसे नाही तर सरकारी दवाखान्यात जावा असे सल्ले दिले जातात
५) धर्मादाय रुग्णालया ने निर्धन व दुर्बल घटका मध्ये रुग्णांना सवलतीच्या दरात व मोफत किती रुग्णांचे इलाज केले याची माहिती धर्मादाय आयुक्त साहेब यांनी दर महिन्याला मागितली पाहिजे जेणेकरून धर्मदाय रुग्णालय निर्धन व दुर्बल घटकांचे इलाज मोफत व सवलतीच्या दारात करत आहे का नाही याची माहिती मिळेल व करत नसतील तर त्यांचा परवाना रद्द करावा रुग्णालय ताब्यात घ्यावे
६) धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांचे रुग्ण गेले असता आमच्या रुग्णालयामध्ये कोणत्याही योजना उपलब्ध नाही कोणत्याही योजनेमध्ये इलाज मिळणार नाही असे सांगण्यात येते
७) पिंपरी-चिंचवड शहरांमधील सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडून दोन प्रतिनिधी परमनंटली प्रत्येक रुग्णालयात बसवावे रुग्णालयावर देखरेख करण्यासाठी त्यांची नियुक्ती करावी जेणेकरून धर्मदाय रुग्णालय निर्धन व दुर्बल घटकांसाठी इलाज सवलतींच्या दरामध्ये व मोफत करत आहे का याच्यावर लक्ष ठेवता येईल
वरील सांगितलेल्या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेऊन सर्व पिंपरी चिंचवड मधील धर्मादाय रुग्णालयांची चौकशी करून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी व इथून पुढे पिंपरी चिंचवड मधील सर्व धर्मादाय रुग्णालयान मध्ये निर्धन व दुर्बल घटकांना मोफत व सवलतीच्या दरात इलाज मिळावा, असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच सदरची निवेदन निखिल दळवी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे याचबरोबर आरोग्य मंत्री प्रकाशआबिटकर व महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनाही दिले आहे.