spot_img
spot_img
spot_img

जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात रवींद्र धंगेकरांचं थेट मोदींना पत्र!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.दरम्यान, यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं असून या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणातील व्यवहार रद्द न झाल्यास २७ ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसण्याचा इशारा रवींद्र धंगेकरांनी दिला आहे.

धंगेकरांनी म्हंटल आहे कि, “तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे. तसेच २७ ऑक्टोबर २०२५ पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे.आजपर्यंतच्या गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष पुरावे दिले की, व्यवहारातील सर्वच व्यक्ती व संस्था या मुरलीधर मोहोळ यांच्या संबंधित आहेत. आज मी या पत्र्यामध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहे”, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

“जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. ही मी निपक्ष:पाती चौकशी तेव्हा शक्य आहे, जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील.कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रिपदावर राहणे योग्य नाही. त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!