शबनम न्यूज | प्रतिनिधी
भरधाव वेगातील कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन भाऊ गंभीर जखमी झाले. ही घटना दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास शिरगाव ते सोमाटणे फाटा रोडवरील ब्रिजजवळ घडली.
कार क्रमांक एमएच-१४ केएफ-५२७१ वरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण गंगाधर वाघ (वय ५६, रा. अभिमान सोसायटी, शिरगाव) यांनी शनिवारी (दि. २५) याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा सुरज आणि सोमेश्वर हे दोघेजण मिठाई आणण्यासाठी दुचाकी वरून चालले होते. ते शिरगाव ते सोमाटणे फाटा रोडवरील ब्रिजजवळ आले असता असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना पाठीमागून धडक दिली.
या अपघातात सुरज याचा पायाचा घोटा फॅक्चर झाला असून सोमेश्वर याच्या खांद्याचे हाड तुटले आहे. कार चालक अपघातानंतर पळून गेला. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.








