spot_img
spot_img
spot_img

महापालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच – अण्णा बनसोडे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना या पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. निवडणूक जवळ येताच तसे प्रवेश होताना दिसतील. महापालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल आणि पक्ष आपले वर्चस्व निर्माण करेल’, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.

अण्णा बनसोडे म्हणाले, ‘राज्यात महायुतीचे सरकार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वजण युतीचा धर्म पाळणार आहेत. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे.२०१७ पूर्वी पिंपरी महापालिकेत १५ वर्षे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यामुळे भाजपचे जास्त नगरसेवक निवडून आले आणि सत्ता आली. पिंपरी-चिंचवड शहराचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, असा ठाम विश्वास आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. इतर पक्षातून अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत.’

‘महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या सर्व पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. कार्यकर्त्यांची कुचंबणा व्हायला नको, यामुळे प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढावे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आठ वर्षांनी निवडणूक होत आहे. त्यामुळे तळागाळात काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्याला लोक निवडून देतील’, असेही ते म्हणाले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!