शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिवाळी सर्वांना आनंदाची जावो, सर्व सुख सुविधा मिळो, अशी आपण दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो. या दिवाळीच्या शुभेच्छा सर्व स्तरातील कुटुंबांना देण्याचा उपक्रम अनेक वर्षापासून राष्ट्रवादीची युवा नेते आतिष बारणे यांच्या सक्षम सोशल फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीचा आनंद सर्वांसोबत वाटण्याचा हा उपक्रम आतिष बारणे यांच्या पुढाकारात तसेच प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.
आदिवासी भागात दिवाळी फराळ वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. यामध्ये भोमाळे गाव ,दिपनगर, शिरगाव, विठ्ठलवाडी, टोकावडे आणि भिसे वस्ती या भागामध्ये आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा उपक्रम म्हणजे फक्त दिवाळी फराळ नाही, तर आनंद द्विगुणीत करण्याचा एक व समाजाशी बांधिलकी जपण्याचा उपक्रम असल्याची प्रतिक्रिया आतिश बारणे यांनी व्यक्त केली आहे.








