spot_img
spot_img
spot_img

PCMC : नवनाथ दशरथ मस्के यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी
आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहरात संघटन मजबूत करण्याच्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षविस्ताराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. नवनाथ दशरथ मस्के यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला असून, पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या हस्ते त्यांना शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पक्षाचे कामगार आघाडी उपाध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली आणि अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी मस्के यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात नवनाथ मस्के यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य निरीक्षक म्हणून काम केले असून, ते भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राहिले आहेत आणि अनेक सामाजिक, आरोग्यविषयक व जनजागृती उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
        या प्रसंगी बोलताना शहराध्यक्ष रविराज काळे म्हणाले, “नवनाथजी मस्के यांच्या रूपाने आम आदमी पार्टीला एक ऊर्जावान आणि लोकसंग्रही नेतृत्व लाभले आहे. ते पक्षाचे विचार आणि धोरणे पिंपरी-चिंचवडच्या जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.”
आपल्या नियुक्तीनंतर मस्के यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आणि म्हणाले, मी पक्षाच्या मूल्यानुसार प्रामाणिकपणे काम करीन आणि आम आदमी पार्टीला पिंपरी – चिंचवड शहरात मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन.
नवनाथ मस्के यांचा पक्षप्रवेश आणि त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती ही आम आदमी पार्टीच्या पिंपरी – चिंचवड शहरात संघटनात्मक वाढीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!