spot_img
spot_img
spot_img

महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेसह काही निवडक ठिकाणी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवेल. तर ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तिन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मात्र, निकालानंतर पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला जाईल.ही रणनीती महाविकास आघाडीला (मविआ) मतविभाजनाचा फायदा मिळू नये, यासाठी आखली गेली आहे, असं सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना केलं आहे. यावरून खासदार मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर स्वबळावर लढू असे मत व्यक्त केले आहे. पुण्यात ते त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मोहोळ म्हणाले, राज्यस्तरावर आमची महायुती आहे. आम्ही, राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आहोत. आमचे नेते जो आदेश देतील तोच आदेश आम्हाला सगळ्यांना पळावा लागेल. या निवडणुका महायुतीचे नेते वरून जे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे. राज्याच्या नेतृत्वाने आम्हाला बैठकीत असे देखील सांगितलं होतं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचा निर्णय घ्यावा लागेल उद्या तसा विचार आला तर बघू. उद्या काही निर्णय घ्यायचा वेळ आला तर आमच्या कोर्टात बॉल येईल पण सध्या तरी राज्याचे नेते जे सांगतील तसंच होईल. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर स्वबळावर लढू.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!