spot_img
spot_img
spot_img

गॅस पुरवठा खंडीत करण्याच्या बतावणीने एक लाखांची फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गॅस पुरवठा खंडीत करण्याच्या बतावणीने प्रभात रस्ता भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण प्रभात रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. एमएनजीएलचे देयक थकले असून, देयक न भरल्यास गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाईल पाठविली.तरुणाने ही फाईल उघडताच मोबाइलमधील गोपनीय माहिती चोरट्यांनी चोरली. तरुणाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. चोरट्यांनी बँक खात्यातून एक लाख एक हजार रुपयांची रुपयांची रोकड लांबविली. रोकड लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर तपास करत आहेत.

महावितरण, एमएनजीएलचे देयक थकीत असल्याची बतावणी करुन चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!