बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि कॉमेडियन असरानी यांनी सोमवारी (२० ऑक्टोबर) अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी असं होते. संध्याकाळी ४ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फुफ्फुसांच्या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूची पुष्टी केली.








