शबनम न्यूज | प्रतिनिधी
विश्वबंधुता साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने विश्वबंधुता मूल्य संवर्धन समिती, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी महाकाव्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये क्रांतीसुर्य सावित्री ज्योती पुरस्कार ,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ज्ञानसाधना पुरस्कार, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, संविधान सन्मान आदर्श पत्रकारिता पुरस्कार, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सदर पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम मंगळवार दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी एसएम जोशी सभागृह, गांजवे चौक नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर काव्य संमेलनात येत्या 25 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान होणार आहे.
यामध्ये सकाळी संविधान स्वागत आणि सन्मान, उद्घाटन समारंभ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार, आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, सावित्रीचे काव्य फुले काव्य संमेलन, आदर्श पत्रकारिता पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कार याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिला भगिनींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.








