spot_img
spot_img
spot_img

दीपोत्सवात क्रांतितीर्थ उजळले

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दीपावलीचे औचित्य साधून धनत्रयोदशी, शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी चिंचवडगावातील क्रांतितीर्थ अर्थात क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या वाड्यात दीपोत्सव साजरा करण्यात आला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. ललित झुनझुनवाला, सौ. झुनझुनवाला, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, शिक्षण विभाग प्रमुख नितीन बारणे, मधुसूदन जाधव, सुहास पोफळे, हेमराम चौधरी, डॉ. शकुंतला बन्सल या मान्यवरांनी प्रज्वलित केलेल्या दीपांनी तसेच विद्युत रोषणाईने
संपूर्ण वास्तू उजळून निघाली होती. याप्रसंगी सुगंधी चाफ्याची फुले आणि मिष्टान्नाचे वितरण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या संयोजनात निखिल परदेशी, अतुल आडे, समर्थ डोंगरे, हर्षदा धुमाळ, सागर शेवाळे, यज्ञेश दराडे, नितीश कलापुरे, किरण गायकवाड, रमा गायकवाड यांनी सहकार्य केले. यावेळी विनोद डोरले यांनी दीपोत्सवातील संस्मरणीय क्षणांचे तसेच राष्ट्रीय संग्रहालयाचे छायाचित्रण केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!