spot_img
spot_img
spot_img

बारामतीकरांना माझ्यासारखा आमदार मिळणार नाही – अजित पवार

बारामतीकरांना माझ्यासारखा आमदार मिळणार नाही. तुम्ही या विधानसभा मतदारसंघाचा १९५२ न पासूनचा इतिहास बघा. माझ्याएवढे काम आजवर कोणाचेच नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले रविवारी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते , तुम्ही १९९२ पासून – प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक आमदाराचीकारकीर्द बघा आणि माझी कारकीर्द बघा. माझ्याएवढे काम करणारा आमदार तुम्हाला परत मिळणार नाही. त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत काय काम केले आणि तुम्ही १९९१ पासून मला संधी दिल्यावर मी काय काम केले, हे तुमच्यासमोर आहे. बारामतीत जेवढे काम मी केले तेवढे करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही.

मी एवढ्यावरच थांबणार नाही. तुम्ही मला या वेळीही प्रचंड मतांनी निवडून दिले आहे. त्यामुळे मागील काळात झाले नाही, एवढे काम मी या पाच वर्षांत करणार आहे. अजित पवार यांच्यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शरद पवार हे करत होते. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानातून त्यांनी काकांवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!