शबनम न्यूज | प्रतिनिधी
दीपावली उत्सवानिमित्त विजय शिंदे युथ फाउंडेशन यांच्यावतीने तसेच माजी नगरसेवक विजय उर्फ शितल शिंदे यांच्या पुढाकाराने किल्ले बनवा स्पर्धा व भव्य गड किल्ले प्रदर्शन २०२५ याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर 2025 सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेसाठी अंतिम नाव नोंदणी 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत असून दि. 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2025 सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेची नाव नोंदणी जनसंपर्क कार्यालय, शॉप नंबर 3 बी, श्रीधर अपार्टमेंट, श्रीधर नगर माटे शाळेजवळ चिंचवड येथे होणार असून स्पर्धेचे ठिकाण स्वातंत्र्यवीर सावकर मार्ग, पिंपरी चिंचवड लिंक रोड, साई ग्रेस सोसायटी व देवी लिंग सोसायटी समोरील पुलाखाली आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये किल्ले बनवा स्पर्धा झाल्यानंतर आपण बनविलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन नागरिकांना पुढील पाच ते सहा दिवस पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. यामध्ये विजेत्या स्पर्धकांचा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरती मानाचे कडे देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे .
या स्पर्धेचे आणि प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे युनेस्को जागतिक वारसा मध्ये नोंद झालेले किल्ले शिवनेरी, किल्ले रायगड, किल्ले पुरंदर , किल्ले विजयदुर्ग यांची भव्य दिव्य प्रतिकृती असणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विजय उर्फ शितल शिंदे यांनी केले आहे.